Home Guard Bharti 2024: महाराष्ट्रात मेगा भरती सुरू; मोफत नोंदणी करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Guard Bharti 2024: महाराष्ट्र शासनाने येत्या काही दिवसांत 9000 हून अधिक होमगार्ड पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा होमगार्डसाठीही नोंदणी सुरू असून, इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

होमगार्ड संघटनेचे उद्दिष्ट

होमगार्ड संघटनेचा उद्देश जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याचे प्रशिक्षण देऊन कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य करण्यासाठी जबाबदार आणि शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा आहे. ही संघटना शासन संचालित असून, पूर्णतः स्वयंसेवी तत्त्वावर आधारित आहे. होमगार्ड म्हणून नोंदणी केल्याने कोणताही नोकरीचा किंवा रोजगाराचा लाभ मिळत नाही.

होमगार्ड म्हणून कार्य करताना

होमगार्ड म्हणून नोंदणी केल्यानंतर, पोलीस दलाच्या मागणीनुसार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, पोलीस दलासोबत बंदोबस्त, आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन, पूर विमोचन तसेच रोगराई, महामारीच्या काळात आणि संपाच्या काळात प्रशासनास मदत कार्य करण्याचे कर्तव्य दिले जाते.

पगार आणि भत्ते (Home Guard Bharti 2024)

होमगार्ड म्हणून कार्य करताना बंदोबस्ताच्या काळात 570 रुपये कर्तव्य भत्ता आणि 100 रुपये उपहार भत्ता मिळतो. प्रशिक्षण काळात 35 रुपये खिसाभत्ता, 100 रुपये भोजन भत्ता आणि साप्ताहिक कवायतीसाठी 90 रुपये कवायत भत्ता दिला जातो.

नोंदणी सुरू असलेल्या जिल्हे

सातारा जिल्हा होमगार्ड अंतर्गत नोंदणी सुरू झाली असून 15 जुलैपासून 31 जुलै 2024 पर्यंत नोंदणी करू शकता. नोंदणी करण्यासाठी कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

होमगार्ड पात्रतेचे निकष

  • शैक्षणिक पात्रता: कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • शारीरिक पात्रता:
    • वय: 20 वर्षे पूर्ण ते 50 वर्षांच्या आत.
    • उंची: पुरुषांसाठी 162 सेंटीमीटर, महिलांसाठी 150 सेंटीमीटर.
    • छाती: फक्त पुरुषांसाठी न फुगवता 76 सेंटीमीटर, आणि फुगवून 81 सेंटीमीटर.

आवश्यक कागदपत्रे (Home Guard Bharti 2024)

  • रहिवासी पुरावा: आधार कार्ड, मतदान ओळखपत्र.
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र.
  • जन्मदिनांक पुरावा: एसएससी बोर्ड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला.
  • तांत्रिक प्रमाणपत्रे (जर लागू असेल तर).
  • खाजगी नोकरीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र.
  • तीन महिन्यांच्या आतले पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र.

अर्ज भरण्याची प्रक्रिया

होमगार्ड नोंदणीसाठी अर्ज 15 जुलै 2024 ते 31 जुलै 2024 या कालावधीत खालील लिंकवरून फक्त इंग्रजी भाषेतून भरायचा आहे. अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून भरावी. अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म मेनूमध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत काढावी. त्या प्रतिवर उमेदवारांनी भरलेले सर्व मजकूर छापून येईल आणि त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिकटवावा. मराठीत नाव उमेदवारांनी स्वतः पेनाने लिहावे.

अर्जाची अंतिम मुदत

ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2024 संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत आहे. सर्व अर्जांची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीची तारीख जाहीर करण्यात येईल.

लिंक

जर तुम्ही होमगार्ड भरतीसाठी इच्छुक असाल, तर आत्ताच खाली दिलेल्या लिंकवरून नोंदणी करून रिक्त जागा निघाल्यानंतर अर्ज सादर करा.

शुभेच्छा!

Leave a Comment


Join WhatsApp Group WhatsApp