इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्मोनल सिलेक्शन (IBPS) आपल्या सहयोगी ११ बँकांमधील क्लेरिकल कॅडरच्या सन २०२५-२६ मधील एकूण रिक्त ६,१२८ पदांच्या भरतीसाठी कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस (CRP Clerks-XIV) ऑगस्ट/ सप्टेंबर/ ऑक्टोबर २०२४ मध्ये आयोजित करणार आहे.
महाराष्ट्रातील रिक्त पदे:
एकूण ५९० पदे (२२ पदे दिव्यांग कॅटेगरीसाठी, ६० जागा माजी सैनिकांसाठी, २६ जागा DESM साठी राखीव)
बँकाचे नाव | एकूण पदे | अजा | अज | इमाव | ईडब्ल्यूएस | खुला |
---|---|---|---|---|---|---|
बँक ऑफ इंडिया | १०६ | १० | ९ | २८ | १० | ४९ |
पंजाब नॅशनल बँक | ११० | ११ | ९ | २९ | ११ | ५० |
पंजाब अँड सिंध बँक | १८ | २ | १ | ४ | १ | १० |
सेंट्रल बँक ऑफ इंडिया | ३५२ | ३५ | ३१ | ९५ | ३५ | १५६ |
इंडियन ओव्हरसिज बँक | ४ | २ | – | २ | – | – |
गोव्यातील रिक्त पदे:
एकूण ३५ पदे
बँकाचे नाव | एकूण पदे |
---|---|
बँक ऑफ इंडिया | ३ |
सेंट्रल बँक ऑफ इंडिया | १८ |
इंडियन ओव्हरसिज बँक | ३ |
पंजाब नॅशनल बँक | १० |
पंजाब अॅण्ड सिंध बँक | ० |
कॅनरा बँक | १ |
महाराष्ट्रातील सहयोगी बँका:
BOB, Bank of Maharashtra, Indian Bank, UCO बँक, युनियन बँक ऑफ इंडिया यांनी रिक्त पदांचा तपशील IBPS ला कळविलेला नाही.
पात्रता:
- शैक्षणिक पात्रता: दि. २१.०७.२०२४ रोजी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आणि स्थानीय भाषेचे व कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक.
- वयोमर्यादा: दि. १ जुलै २०२४ रोजी २० ते २८ वर्षे (इमाव विधवा/ परित्यक्ता/ ज्युडिशियली सेपरेटेड महिला खुला गट ३५/ इमाव ३१ वर्षे; अजा/अज ३३ वर्षे; दिव्यांग ३८/४१/४३ वर्षे; अजा/अज ४० वर्षे).
प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग:
सहयोगी बँका अजा/ अज/ दिव्यांग/ अल्पसंख्यांक/ माजी सैनिक उमेदवारांना नि:शुल्क प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, पणजी इ. केंद्रांवर दि. १२ ते १७ ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करणार आहेत. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना तशी नोंद करावी.
अर्जाचे शुल्क:
- अजा/ अज/ दिव्यांग/ माजी सैनिक उमेदवारांसाठी: रु. १७५/-
- इतर उमेदवारांसाठी: रु. ८५०/-
परीक्षा केंद्रे:
- पूर्व परीक्षा: अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ ठाणे/ नवी मुंबई/ MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर.
- मुख्य परीक्षा: औरंगाबाद, मुंबई, ठाणे/ नवी मुंबई/ MMR, नागपूर, पुणे.
निवड पद्धती:
- प्रीलिमिनरी परीक्षा: (ऑब्जेक्टिव्ह टाईप) १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ६० मिनिटे.
- इंग्लिश लँग्वेज: ३० प्रश्न, ३० गुण
- न्यूमरिकल अॅबिलिटी: ३५ प्रश्न, ३५ गुण
- रिझनिंग अॅबिलिटी: ३५ प्रश्न, ३५ गुण
- मुख्य परीक्षा: (ऑब्जेक्टिव्ह टाईप) १९० प्रश्न, २०० गुण, वेळ १६० मिनिटे.
- जनरल/ फिनान्शियल अवेअरनेस: ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ३५ मिनिटे
- जनरल इंग्लिश: ४० प्रश्न, ४० गुण, वेळ ३५ मिनिटे
- रिझनिंग अॅबिलिटी अँड कॉम्प्युटर अॅप्टिट्यूड: ५० प्रश्न, ६० गुण, वेळ ४५ मिनिटे
- क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड: ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ४५ मिनिटे
अर्ज करण्याची पद्धत:
- ऑनलाइन अर्ज www.ibps.in या संकेतस्थळावरील जाहिरातीमधील “Click here to apply for CRP Clerks XIV” या लिंकमधून दि. २८ जुलै २०२४ पर्यंत करावेत.
- ऑनलाइन अर्जासोबत रंगीत फोटोग्राफ, सिग्नेचर, डाव्या अंगठयाची निशाणी, स्वहस्ते लिहिलेले घोषणापत्र, अॅपेंडिक्स-१ प्रमाणपत्र यांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करणे आवश्यक.
अधिक माहितीसाठी कृपया संकेतस्थळावरील जाहिरात वाचावी.