Bank recruitment 2024:नोकरीची संधी;बँकामध्ये नोकरीची संधी!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्मोनल सिलेक्शन (IBPS) आपल्या सहयोगी ११ बँकांमधील क्लेरिकल कॅडरच्या सन २०२५-२६ मधील एकूण रिक्त ६,१२८ पदांच्या भरतीसाठी कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस (CRP Clerks-XIV) ऑगस्ट/ सप्टेंबर/ ऑक्टोबर २०२४ मध्ये आयोजित करणार आहे.

महाराष्ट्रातील रिक्त पदे:

एकूण ५९० पदे (२२ पदे दिव्यांग कॅटेगरीसाठी, ६० जागा माजी सैनिकांसाठी, २६ जागा DESM साठी राखीव)

बँकाचे नावएकूण पदेअजाअजइमावईडब्ल्यूएसखुला
बँक ऑफ इंडिया१०६१०२८१०४९
पंजाब नॅशनल बँक११०११२९११५०
पंजाब अँड सिंध बँक१८१०
सेंट्रल बँक ऑफ इंडिया३५२३५३१९५३५१५६
इंडियन ओव्हरसिज बँक

गोव्यातील रिक्त पदे:

एकूण ३५ पदे

बँकाचे नावएकूण पदे
बँक ऑफ इंडिया
सेंट्रल बँक ऑफ इंडिया१८
इंडियन ओव्हरसिज बँक
पंजाब नॅशनल बँक१०
पंजाब अॅण्ड सिंध बँक
कॅनरा बँक

महाराष्ट्रातील सहयोगी बँका:

BOB, Bank of Maharashtra, Indian Bank, UCO बँक, युनियन बँक ऑफ इंडिया यांनी रिक्त पदांचा तपशील IBPS ला कळविलेला नाही.

पात्रता:

  • शैक्षणिक पात्रता: दि. २१.०७.२०२४ रोजी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आणि स्थानीय भाषेचे व कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक.
  • वयोमर्यादा: दि. १ जुलै २०२४ रोजी २० ते २८ वर्षे (इमाव विधवा/ परित्यक्ता/ ज्युडिशियली सेपरेटेड महिला खुला गट ३५/ इमाव ३१ वर्षे; अजा/अज ३३ वर्षे; दिव्यांग ३८/४१/४३ वर्षे; अजा/अज ४० वर्षे).

प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग:

सहयोगी बँका अजा/ अज/ दिव्यांग/ अल्पसंख्यांक/ माजी सैनिक उमेदवारांना नि:शुल्क प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, पणजी इ. केंद्रांवर दि. १२ ते १७ ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करणार आहेत. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना तशी नोंद करावी.

अर्जाचे शुल्क:

  • अजा/ अज/ दिव्यांग/ माजी सैनिक उमेदवारांसाठी: रु. १७५/-
  • इतर उमेदवारांसाठी: रु. ८५०/-

परीक्षा केंद्रे:

  • पूर्व परीक्षा: अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ ठाणे/ नवी मुंबई/ MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर.
  • मुख्य परीक्षा: औरंगाबाद, मुंबई, ठाणे/ नवी मुंबई/ MMR, नागपूर, पुणे.

निवड पद्धती:

  • प्रीलिमिनरी परीक्षा: (ऑब्जेक्टिव्ह टाईप) १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ६० मिनिटे.
    • इंग्लिश लँग्वेज: ३० प्रश्न, ३० गुण
    • न्यूमरिकल अॅबिलिटी: ३५ प्रश्न, ३५ गुण
    • रिझनिंग अॅबिलिटी: ३५ प्रश्न, ३५ गुण
  • मुख्य परीक्षा: (ऑब्जेक्टिव्ह टाईप) १९० प्रश्न, २०० गुण, वेळ १६० मिनिटे.
    • जनरल/ फिनान्शियल अवेअरनेस: ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ३५ मिनिटे
    • जनरल इंग्लिश: ४० प्रश्न, ४० गुण, वेळ ३५ मिनिटे
    • रिझनिंग अॅबिलिटी अँड कॉम्प्युटर अॅप्टिट्यूड: ५० प्रश्न, ६० गुण, वेळ ४५ मिनिटे
    • क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड: ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ४५ मिनिटे

अर्ज करण्याची पद्धत:

  • ऑनलाइन अर्ज www.ibps.in या संकेतस्थळावरील जाहिरातीमधील “Click here to apply for CRP Clerks XIV” या लिंकमधून दि. २८ जुलै २०२४ पर्यंत करावेत.
  • ऑनलाइन अर्जासोबत रंगीत फोटोग्राफ, सिग्नेचर, डाव्या अंगठयाची निशाणी, स्वहस्ते लिहिलेले घोषणापत्र, अॅपेंडिक्स-१ प्रमाणपत्र यांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करणे आवश्यक.

अधिक माहितीसाठी कृपया संकेतस्थळावरील जाहिरात वाचावी.

Leave a Comment


Join WhatsApp Group WhatsApp